महापालिका प्रशासनाकडून एकूण 53 बचत गटांना अर्थसाह्य

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 10 वर्ष पूर्ण झालेल्या महिला बचत गटांना 25 हजार रुपयाचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी 53 बचत गट पात्र ठरले आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेतर्गंत उद्योगनरीतील महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

महिला व बालकल्याण योजनेतर्गत 10 वर्ष पुर्ण झालेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. या बाबतचा ठराव 2010 साली सर्वसाधरण सभेत मंजूर केला आहे. यासाठी 2017-18 वर्षांकरीत शहरातून 148 अर्ज आले होते. या योजनेतील अटी व शर्तीनूसार त्यातील 53 अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या 53 बचत गटांना एकूण 13 लाख 25 हजार रुपये रक्कम अर्थसाहय्य म्हणून देण्यात येणार आहे. तसेच या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या बचत गटांनी 31 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची पुर्तता केल्यात त्यांनाही अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)