महापालिका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोरे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आबा विठोबा गोरे तर उपाध्यक्षपदी संजय दशरथ कुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पतसंस्थेच्या पिंपरी येथील कार्यालयात झालेल्या बैठकीस सहकारी संस्था उपनिबंधक अधिकारी सचिन सरसमकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व प्रथम बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यावेळी सचिवपदी सीमा सुकाळे व खजिनदारपदी महाद्रंग वाघेरे यांची निवड करण्यात आली. सचिन सरसमकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, राजाराम चिंचवडे, अंबर चिंचवडे, मनोज माछरे, चारुशिला जोशी, दिलीप गुंजाळ, यशवंत देसाई, सतीश गव्हाणे, रमेश चोरघे, भगवान मोरे, नथा मातेरे, नंदकुमार घुले, संस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर, उपव्यवस्थापक प्रल्हाद सुतार आदी उपस्थित होते.

महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची स्थापना 13 जुलै 1972 साली झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका व पीसीएमटीतील 5 हजार 500 कामगार सभासद आहेत. भाग भांडवल 52 कोटी, ठेवी 52 कोटी, कर्ज वितरण 115 कोटी तर मागील वर्षी 9 कोटी 36 लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. थकीत कर्जाचे प्रमाण अर्धा टक्‍क्‍याहून कमी आहे. संस्थेने मागील वर्षी 11 टक्के लाभांश दिला आहे. ऑडिट वर्ग अमध्ये असून संस्थेचे सर्व कामकाज संगणकीकृत आहे. शशिकांत झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली संस्था आर्थिक उन्नत्ती साधत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने या पतसंस्थेस आदर्श पतसंस्था म्हणून गौरविले आहे. कर्जदार सभासदाच्या मृत्यूनंतर सर्व कर्ज माफ करणारी एकमेव पतसंस्था आहे अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)