महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मंचर- ग्रामीण रुग्णालय घोडेगाव आरोग्य विभाग यांच्या वतीने मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत वार्षिक आरोग्य तपासणी शिविराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‌घाटन रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य उत्तम आवारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य माधव कानडे, पर्यवेक्षक व्ही. पी. पवार, रयत बॅंकेचे संचालक पंढरीनाथ बारवे, विलास बेंडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजाता वर्पे, डॉ. ज्योती वाळूंज यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. विलास बेंडे, सुवर्ण गोसावी, प्राची चौधरी, रामदास तांबे, धीरज कोळेकर यांनी आरोग्य शिबिराचे नियोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)