महात्मा गांधींजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेयला अटक

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूनम पांडेय आणि तिचा पती अशोक पांडेय यांना आज अखेर अटक करण्यात आली आहे. या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. अटकेच्या कारवाईपूर्वी पोलिसांनी पूजा पांडेयसहीत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण – 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी रोजी देशात सर्वत्र त्यांना श्रध्दांजली वाहत असताना उत्तर प्रदेशातील अलिगड येथे पूजा पांडेय यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मकरित्या गोळ्या झाडल्या आणि शौर्य दिवस साजरा केला. तसेच महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांचा जयजयकार केला. या कृत्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकनाकडून पूजा पांडेय यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.