महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला लागली भीषण आग

महाड :  महाड एमआयडीसीतील प्रिव्ही कंपनीला भीषण आग लागली आहे. दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास प्रीव्ही कंपनीतील एका हायड्रोजन प्लांटमध्ये स्फोट झाला आणि कंपनीत आग भडकली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड तासात या कंपनीतून आणखी २० स्फोटांचे आवाज आले. मात्र हे स्फोट नेमके कशाचे होते याचे तपशील मिळू शकले नाहीत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग प्रचंड मोठी असल्याने ती आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, आगीनं रौद्र रुप धारण केलं असल्याने ही आग विझवण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)