महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्याला राष्ट्रवादीने ठरवलं ‘वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’  

पुणे: राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला पडलेल्या भगदाडाचं खापर उंदीर, घुशी आणि खेकड्यांवर फोडलं होतं. आता महाजनांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यामध्ये एक फ्लेक्स लावण्यात आला असून सदर फ्लेक्सवर गिरीश महाजनांच कालच वक्तव्य “उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटला” व त्याखाली मिश्किलपणे “वेड्यांचा बाजार व पेढ्यांचा पाऊस” असे लिहण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान राष्ट्रवादीच्या या ‘फ्लेक्सचे’ भाजपकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)