महसूल कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशी ही कामबंद

हल्लेखोरांना अटक करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा

सातारा,दि.31 प्रतिनिधी- वहागाव,ता.कराड येथे वाळू तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी ही कायम राहिले. मंगळवार ही महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवत जो पर्यंत हल्लेखोरांना अटक होणार नाही, तो पर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील उपविभागीय तथा प्रांत कार्यालय व तहसिलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी, तलाठी व कोतवालांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल कर्मचारी व संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत महसूल विभागाती कोणत्याही कर्मचाऱ्याला धक्का जरी लागला तरी आता प्रत्येक कर्मचाऱ्याने आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी आपल्यामधील एकी कायम ठेवून जो पर्यंत हल्लेखोरांना अटक होणार नाही तो पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याने काम करायचे नाही. प्रत्येकाने कार्यालयात आपल्या जागी बसून रहायचे असून वरिष्ठांनी दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ संघटना प्रतिनिधींशी संपर्क साधा, असे संघटनेचे अध्यक्ष सागर कारंडे यांनी सांगितले. यावेळी नंदकुमार गुरव, गुलाब साळुंखे,चंद्रकांत पारखे, संतोष झनकर, संतोष भोसले, पंकज शिंदे, आश्‍पाक शेख, प्रमोद उगले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 महसूली कामावर परिणाम
काम बंद आंदोलनात 12 नायब तहसिलदार, 152 अव्वल कारकून, 190 लिपीक, 122 शिपाई, 466 तलाठी, 64 मंडलाधिकारी, 450 कोतवाल, 15 वाहन चालक सहभागी झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिलदार व प्रांत कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. तसेच सातारा तहसिलदार कार्यालयात रेशनकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना मंगळवारी हेलपाटा सहन करावा लागला होता. तसेच तलाठ्यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे गावस्तरावर महसूली कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)