महसुलचा एकाच दिवशी “षटकार”

खटाव तालुक्‍यात वाळु तस्करी करणारी सहा वाहने ताब्यात

वडूज, दि. 25 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील बोकाळलेल्या वाळु तस्करीला पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून एका दिवसात सहा वाहने ताब्यात घेतली. या कारवाईमुळे जवळपास पंधरा लाखांचा दंड वसूल होणार असून वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे.
रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मायणी (विखळे) येथे अवैध वाळू वाहतुक सुरू असल्याची खबर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार जयश्री आव्हाड यांना मिळाली. त्यानंतर भरारी पथक व स्थानिक कर्मचारी यांना सोबत घेऊन तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून भरदिवसा अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच 11 एएल 306), डंपर (एमएच 11- एएल 4551) व डंपर (एमएच – 11- एएल – 3179) हे तीन डंपर पकडले तर रविवारी पहाटे काटेवाडी, ता. खटाव येथे दोन ट्रॅक्‍टरवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कल्याण रामचंद्र जगदाळे यांचा ट्रॅक्‍टर (एमएच – 11- जी – 876) व उदय विजय सूर्यवंशी यांच्या मालकीचा ट्रॅक्‍टरवर नंबर नसलेला महिंद्रा अर्जुन 555 लाल रंगाचा ताब्यात घेण्यात आला तर पहाटे अंबवडे येथे तलाठी अक्षय साळुंखे यांनी एक अवैध वाळु उपसा करताना एक ट्रॅक्‍टर पकडला. या कारवाईमुळे महसुलने षटकार मारला आहे. वाळुवर डल्ला मारणाऱ्या वाळू सम्राटांचे चांगलेच धाबे दणाणले असून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व नुतन तहसीलदार जयश्री आव्हाड यांच कौतुक केल जात असुन या कारवाईत तहसीलदार जयश्री आव्हाड, भरारी पथकातील गणेश बोबडे, संतोष ढोले, तुषार पोळ, रवि शिंदे, महेश शिंदे, तलाठी घोरपडे, चाटे व पथकातील पोलीस पाटील यांनी भाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)