महंमद शमी, अदिल रशीदचा जागतिक संघात समावेश 

विंडीज मदतनिधी सामना आज रंगणार 
दुबई – गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या वेस्ट इंडीजमधील विविध स्टेडियमची पुन्हा एकदा उभारणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मदतनिधी क्रिकेट सामन्याकरिता आयसीसीच्या जागतिक संघात हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज महंमद शमीचा समावेश करण्यात आला आहे. पांड्याला विषाणूसंसर्ग झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा शमी सदस्य होता.

या टी-20 सामन्यासाठी जागतिक संघात भारताच्या दिनेश कार्तिकची याआधीच निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर उद्या (गुरुवार) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून मिळणारे सर्व उत्पन्न विंडीजमधील स्टेडियमला दिले जाणार आहे. इंग्लंडचा रिस्ट स्पिनर अदिल रशीद याचाही जागतिक संघात समावेश करण्यात आला असून इयान मॉर्गननंतर या संघातील तो इंग्लंडचा दुसरा खेळाडू आहे. याशिवाय जागतिक संघात पाकिस्तान व न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन, तर अफगाणिस्तान, बांगला देश, नेपाळ व श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
आयसीसी जागतिक संघ असा आहे- इयान मॉर्गन (कर्णधार) व अदिल रशीद (इंग्लंड) महंमद शमी व दिनेश कार्तिक (भारत), शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक (पाकिस्तान), मिशेल मॅकक्‍लॅनेघन व ल्यूक रॉंची (न्यूझीलंड), तमिम इक्‍बाल (बांगला देश), थिसारा परेरा (श्रीलंका), रशीद खान (अफगाणिस्तान), संदीप लामिच्छने (नेपाळ).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)