मसूद अझहरचा उजवा हात मुफ्ती यासिरला कंठस्नान

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्‍मीरच्या त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती यासिर याला कंठस्नान घालण्यात आले आहे. याबाबत पोलीस महासंचालक एसपी वैद यांनी आपल्या ट्‌वीटरवरुन अधिकृत माहिती दिली आहे. यासिर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसहूद अझहर याचा उजवा हात मानला जायचा.

पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे मंगळवारी सुरक्षा दल आणि जवानांनी केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते, ज्यात कमांडर मुख्ती याशिर याचाही समावेश होता. दरम्यान, चकमकीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि गोळाबारूद जप्त करण्यात आला होता. या चकमकीत दोन जवानही शहीद झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)