मशाल फेरी काढून वॉटर कपसाठी जनजागृती

गोंदवलेकरांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार

गोंदवले, दि. 24 (वार्ताहर) – माणसांच्या मनात असणारा अंधकाराचा काळोख मशालीच्या उजेडाद्वारे दूर करून फक्त गाव पाणीदार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत गोंदवले खुर्दमध्ये मशाल फेरीचे नियोजन करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ, महिला, शालेय मुले-मुली उपस्थित होते.
श्रमदानाचे तुफान आलंय या प्रमाणे गोंदवले खुर्द मध्ये मारुती मंदिरा समोर शालेय युवक युवती जेष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले व माणसांच्या मनातील अंधकार दूर करण्याचा हेतूने एक मशाल प्रज्वलित करण्यात आली आणि बघता बघता असंख्य मशाली एका मशालीने पेटवण्यात आल्या हीच किमया आहे एकत्रित काम करण्याची, मशाली पेटवल्या नंतर हालगी आणि वाद्यांच्या गजरात ही रॅली शिवनेरी चौकात तिथून एसटी स्टॅंड, इंदिरा नगर व संपुर्ण गावातून पाणी फाउंडेशन बद्दल काम करण्याच्या घोषणा देत ही रॅली पुन्हा मारुतीच्या मंदिरा पुढे आली त्यानंतर उपस्थित लोकांना बारामती येथील ऍड. यांनी 45 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत सांगून हे काम कागदोपत्री जरी 45 दिवसांचा असलं तरी ते तुम्ही 40 दिवसात कसं पूर्ण करू शकता हे गोष्टी द्वारे पटवून दिले माण तालुक्‍यातील लोक जिद्दी आणि खूप मेहनती असून एकदा एकादी गोष्ट मनात घेतली तर पूर्ण केल्या शिवाय स्वस्थ बसत नाहीत म्हणून तर राज्यात टाकेवाडी आणि बिदाल ह्या जिह्यातील गावांनी उच्चांक केला व आम्ही आता दुष्काळी नाही ही महती दाखवून दिली.म्हणून राहिलेल्या गावांनी दुष्काळी परिस्थिती वर मात करायची असेल तर आपल्या गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन थेंब आपण अडवला पाहिजे.हे पाणी अडवण्यासाठी आपण गावाच्या लाभक्षेत्रातील असणाऱ्या सगळ्या ठिकाणी सलग समतल चार, बंधारे,यांच्या माध्यमातून कामे करून या मध्ये पावसाचे पाणी साठवण्याचे काम पूर्ण करायचे आहे ते तुम्ही कराल हे या उपस्थिती वरून कळत आहे.यावेळी ग्रामस्थांनी एक मुखी श्रमदान करनार असल्याचं जाहीर केले

 

Leave A Reply

Your email address will not be published.