मळवली येथे येत्या शनिवारी महाराजस्व अभियान

कार्ला – कार्ला मंडलमध्ये नागरिकांसाठी सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानात येत्या शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मळवली संपर्क रेल्वे स्टेशन येथे विस्तारीत समाधान मेळावा आयोजित केला आहे. यात सर्व शासकीय लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी लाभार्थींनी अवश्‍य लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ-मुळशी उप विभागीय अधिकारी सुभाष बागडे, मावळ तहसिलदार रणजित देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले, राजकुमार गभाले, मंडल अधिकारी (कार्ला) माणिक साबळे यांनी केले आहे.

कार्ला, दहिवली, वेहरगाव, औंढे खुर्द, औंढौली, देवले, पाटण, भाजे, मळवली, ताजे, पाथरगांव, पिंपळोली, बुधवडी, बोरज, वडिवळे, टाकवे खुर्द, मुंढावरे, वळक, शिलाटणे, खांडशी, नेसावे, भाजगाव, वडवली, वेल्हवळी, सांगिसे, सोमवडी, उकसान, जांभवली, थोराण, राकसवाडी, वळवती, शिरदे येथील नागरिकांसाठी अभियान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महसूल विभाग, तहसील कार्यालय मावळ अंतर्गत उत्पन्न, रहिवास, राष्ट्रीयत्व, अल्प भू-धारक, शिधा-पत्रिकेतमध्ये नव्याने नाव समाविष्ट, नाव कमी करणे, दुबार शिधा-पत्रिका, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृती वेतन योजना व शिष्यवृती योजना, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड नोंदणी, 7/12 उतारे, 8-अ खाते उतारा, फेरफार उतारा, 7/12 संगणकीकरणमध्ये झालेली चूक-दुरूस्ती अर्ज स्वीकारणे, नागरिकांच्या मागणीनुसार वितरण होणार आहे. याचबरोबर कलाकार मानधन वाटप, इंदिरा आवास घरकुल योजना अनुदान धनादेश वाटप करण्यात येणार आहे.

याबरोबर पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशू संवर्धन विभाग, महा-वितरण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, बॅंक विभाग, भूमी अभिलेख विभाग, वाहन परवाना, माता सन्मान, विमा पॉलिसी, भारत संचार निगम या विभागातील कामे या ठिकाणी करून मिळणार आहे.

तरी मंडल भाग कार्ला अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांनी राज्य शासनाच्या महाराजस्व अभियाना अंतर्गत विस्तारक समाधान मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मावळ तहसिलदार रणजित देसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)