मल्यासह ‘या’ आरोपींची संपत्ती ईडी जप्त करणार

नवी दिल्ली : विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने या आरोपींची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे.

पहिली कारवाई मद्य व्यापारी विजय मल्यावर होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणाऱ्या कोर्टांशी संपर्क साधत या सर्वांविरोधात नव्या अध्यादेशानुसार ईडीला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

दरम्यान, ईडीने मल्या प्रकरणात आजवर ९,८९० कोटी आणि नीरव मोदी-चोक्सी यांच्या प्रकरणात ७,६६४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या अध्यादेशानुसार, पहिली कारवाई १५,००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)