मल्याळी समाजमच्या चित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

निगडी – येथील चिंचवड मल्याळी समाजमच्या (सीएमएस) वतीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय राजा रवी वर्मा चित्र प्रदर्शनाचे आकुर्डी येथे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी केरला ललित कलाकेंद्राचे एब्बी जोसेफ, सीएमएसचे अध्यक्ष पी. व्ही. भास्करन, शाहीर अशोक कामथे, श्रावण जाधव, शिल्पकार संजय कुंभार, सीएमएसचे उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, खजिनदार के. व्ही. जनार्दनन आदी उपस्थित होते. प्रा. नितीन तावरे, रवींद्र मालवदे, रश्‍मी बाफना, निताली हर्गुडे, मेघा मोहनन, वर्षा भिंगारे, माया उग्रन, पुर्वा गवळी, सुमा बाबू या चित्रकारांसह सीएमएस शाळेतील 36 बाल चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

इंटरमिजिएट स्पर्धेत राज्यात प्रथम आलेली पुर्वा गवळी हिने रेखाटलेली चित्रे प्रदर्शनाचे आकर्षण ठरले. यावेळी प्रा तावरे यांनी चित्रकला क्षेत्रात सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या केरला भवनमध्ये प्रदर्शन सर्वांसाठी 27 तारखेपर्यंत विनामूल्य खुले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू नायर यांनी केले. तर मधुरा सराफ यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.