मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध समाप्त

तपास सुरु ठेवण्याची प्रवाशांच्या नातेवाईकांची मागणी

सिंगापूर – मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला शोध काल समाप्त झाला. मात्र या विमानाचा कोणताही ठावठिकाणा शोधला जाऊ शकलेला नाही. “एमएच 370′ हे मलेशिया एअरलाईन्सचे विमान 23 मार्च 2014 रोजी कुआलांपूरवरून बिजींगला जात असताना अचानक बेपत्ता झाले होते. त्या विमानाचा शोध घेण्यासाठी मलेशिया सरकारने खासगी संस्थेची मदत घेतली होती. मात्र या शोधामध्येही विमानाचा कोणताही ठावठिकाणा शोधला जाऊ शकला नसल्याने प्रवाशांच्या नातेवाईकांनी शोध सुरुच ठेवण्याची मागणी मलेशियातील नवनियुक्‍त सरकारकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विमानाच्या शोधासाठी मलेशिया, चीन आणि ऑस्ट्रेलियाने प्राथमिक शोध घेतला होता. हा शोध गेल्यावर्षी जानेवारीमध्ये थांबवण्यात आला. त्यानंतर मलेशियाने अमेरिकेतील ओशन इन्फिनिटी या कंपनीकडे या विमानाच्या शोधाची जबाबदारी सोपवलेली होती. त्या शोधमोहिमेची 90 दिवसांची मुदत 29 मे पर्यंत होती. विमानाचा शोध लागला तरच मोबदला दिला जाईल या बोलीवर ही शोधमोहिम राबवली गेली होती. या कंपनीने हिंदी महासागरात घेतलेला शोध अपयशी ठरला. आता या विमानाचा नव्याने शोध घेतला जाणार नसल्याचे मलेशिया सरकारने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)