मलठणमध्ये मोफत गॅस कनेक्‍शनचे वितरण

राजेगाव – मलठण (ता. दौंड) येथे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत परिसरातील गरजू व गरीब चाळीस महिलांना मोफत गॅस कनेक्‍शन वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती तारा देवकाते आणि पवनपुत्र गॅस एजन्सीचे मालक राहुल देवकाते यांनी गॅस वितरण केले. यावेळी महिलांना गॅस कसा वापरावा, याबाबत पै. शंकर मरगळे यांनी माहिती दिली. या परिसरात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, अनेक महिलांना चुलीवर स्वयंपाक कराव लागत असल्याने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना गॅस जोडणी दिल्याने त्यांच्या आरोग्यवर विपरीत परिणाम होणार नाही. यावेळी मलठणचे सरपंच हनुमंत कोपणर, वाटलुचे सरपंच युवराज शेंडगे, माऊली चव्हाण, काका शेंडगे, घनश्‍याम देवकाते, गणेश शेंडगे, डॉ. प्रमोद रंधवे, भाऊसाहेब देवकाते, हनुमंत शेंडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.