मर्सिडीजकडून 1 लाख गाड्यांचे भारतात उत्पादन 

नवी दिल्ली – पुणे येथे कारखाना असलेल्या मर्सिडीज बेंझ कंपनीने आपला 1 लाख कारच्या उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. यासाठी कंपनीला 24 वर्ष लागली. आता अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. यामुळे पुढील एक लाख कार कमी वेळेत तयार होतील, असे कंपनीला वाटते. कंपनीने भारतातच मोठ्या प्रमाणात उत्पादन करून मेक ईन इंडियाला चालना दिली आहे. त्याचबरोबर इतक्‍या मोठ्या प्रमाणात ग्राहक कंपनीला मिळाले आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहकांचा कंपनीच्या उत्पादनावरील विश्‍वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीने अपली जागतिक पातळीवर सर्व मॉडेल भारतात सादर केली आहेत. गेल्या दोन वर्षात नोटाबंदी आणि जीएसटीनंतरही कंपनीच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोलॅण्ड फोल्जर यानी सांगीतले, की भारताच्या क्षमतेत वाढ होणार आहे, यावर आमचा विश्‍वास होता. आता आम्ही इतक्‍या मोठ्या प्रमाणात वाहन विक्री केल्यामुळे आमचा विश्‍वास खरा ठरला आहे. आम्ही भविष्यातही भारतीय ग्राहकांना नवनवी उत्पादने सादर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले. 2014 मध्ये कंपनीने 50 हजार कार विक्रीचा टप्पा ओलांडला होता. कंपनीने आपल्या कामाला 1994 मध्ये सुरुवात केली. त्यानंतर इतर लक्‍झरी कार कंपन्या भारतात आल्या. भारतात तयार केलेल्या कारची निर्यात होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)