मर्ढे ग्रामस्थांना न्या मिळणार का?

पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींची उदासिनता
विरमाडे (वार्ताहर) – कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होणारी चिंधवलीकरांची होणारी गैरसोय नवीन पुलामुळे कायमची थांबली आहे. मात्र, चिंधवलीप्रमाणेच मर्ढे ग्रामस्थांची होत असलेली गैरसोयही थांबवावी, अशी आर्त हाक मर्ढे ग्रामस्थ प्रशासनासह लोकप्रतिनिधींना देत आहेत.

सातारा तालुक्‍यातील परंतु, पूर्वी जावली आणि सध्या कोरेगाव मतदार संघात असणाऱ्या मर्ढे गावाची विकासाच्या बाबतीत नेहमीच हेळसांड झाली आहे. दरम्यान, चिंधवलीप्रमाणेच मर्ढे गावातही कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पुल पाण्याखालीच असतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मर्ढे गावास महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना गावाबाहेर पडणे कठीण होते. येथील ग्रामस्थांना कारखानामार्गे भुईंज असा महामार्गापर्यंत येण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अनेकजण गावाबाहेर पडणेच टाळतात. विद्यार्थ्यांना तर शाळेला दांड्याच माराव्या लागतात. त्यामुळे मुलांचेही शैक्षशिणक नुकसान होते. त्यामुळे मर्ढे येथे कृष्णा नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी वारंवार मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, ग्रामस्थांच्या या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींही दुर्लक्षच केले आहे.
शिंदेसाहेब नेमकी अडचण तरी काय?

सातारा तालुक्‍यातील परंतु, कोरेगाव मतदार संघातील गोवे येथील, कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाची उंची वाढण्याच्या कामास साहेबांच्या मेहरबानीने प्रारंभ झाला आणि काम पूर्णत्वास जाऊन पुल वाहतुकीसाठी खुलाही झाला. मात्र, बेंबीच्या देटापासून पुलासाठी ओरडणाऱ्या मर्ढे ग्रामस्थांची हाक साहेबांपर्यंत अजून पोहोचलीच नाही की काय? पुलाची उंची वाढविण्यासाठी नेमकी अडचण तरी काय? असा थेट सवाल शिंदेसाहेबांसाठी मर्ढे ग्रामस्थांमधून होत आहे.

मर्ढेकरांच्या नशिबी केवळ आश्‍वासनेच पूर्वीही आणि आत्ताही आमदार शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात असलेल्या मर्ढे ग्रामस्थांची कमी उंचीच्या पुलामुळे दरवर्षीच पावसाळ्याच्या दिवसांत वाताहात होत आहे. पुलाची उंची वाढवावी यासाठी ग्रामस्थांनीही वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्यापही मर्ढेकरांना आश्‍वासनाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)