मर्चंट नेव्हीत करिअर करायचंय? (भाग एक)

जगभ्रमंती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. जर ही इच्छा जहाजावर राहून पूर्ण करता आली तर…? मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन असे करता येणे शक्‍य आहे. मर्चंट नेव्ही हा पूर्णपणे सिविलियन जॉब आहे. याच्या माध्यामातून विदेशात जाण्याची संधी मिळते. त्यामुळे भटकंती करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे. या क्षेत्रामध्ये करिअर केल्यानंतर केवळ चांगली कमाईच होते असे नाही तर अनेक रोमांचक अनुभवही या क्षेत्रात घेता येतात.

बारावीवीमध्ये पीसीएम – या क्षेत्रामध्ये भरती होण्यासाठी 12 वी फिजिक्‍स, केमेस्ट्री आणि मॅथ्स उतीर्ण होणे अनिवार्य आहे. या क्षेत्रामध्ये केवळ अविवाहित उमेदवारांचीच निवड केली जाते. याशिवाय उमेदवाराकडे भारतीय नागरिकत्व असले पाहिजे. भरतीसाठी स्क्रिनिंग, मुख्य परीक्षा, साक्षात्कार आणि मेडिकल परीक्षा द्यावी लागते.

पदवीनंतर घ्या प्रवेश – बीएससी (निर्धारित विषयांमध्ये) नंतरही या क्षेत्रामध्ये प्रवेश करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला नॉटिकल सायन्स किंवा मरीन केटरिंगची निवड करावी लागेल. तर बीईमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनियरिंग, नवल आर्किटेक्‍चर इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, ओशियन इंजीनियरिंग, सिव्हिल इंजिनियरिंग, इलेक्‍ट्रिकल अँड इलेक्‍ट्रोनिक्‍स इंजिनियरिंगपैकी एकाची निवड करावी लागेल.

मर्चंट नेव्हीची आवश्‍यकता – मर्चंट नेव्ही हे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित क्षेत्र आहे. या माध्यमातून जगभरात मालाची आयात निर्यात केली जाते. मर्चंट नेव्हीशिवाय आयात-निर्यातचा व्यापार करणे अशक्‍य आहे.साधारण गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मर्चंट नेव्ही जॉईन करता येते. इंजिनियरिंग अथवा मेडिकलसंबंधी डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला 3 ते 5 वर्ष लागतात. मात्र, या कोर्सचा कमीतकमी कालावधी हा सहा महिन्यांचा आहे. या नोकरीचा आणखी एक फायदा असा आहे की, येथे तुम्हाला मोफत खाणे, राहणे, पेड लीव, बोनस, हॉलिडे ट्रॅव्हल्सची सुविधा देण्यात येते. याशिवाय परिवारातील सदस्यांसाठीदेखील अनेक सुविधा देण्यात येतात.

करियर साप्ताहिकी (भाग २)

या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष : या क्षेत्रामध्ये पैशासोबत अनेक अडचणीदेखील आहेत. त्यामुळे उमेदवाराची शारीरिक क्षमता चांगली असणे आवश्‍यक असते. या क्षेत्रात अनेक दिवसांसाठी समुद्रात राहावे लागते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थित स्वतःला ऍडजेस्ट करता आले पाहिजे. याशिवाय उमेदवाराला साहसी कार्यांमध्ये आवड असली पाहिजे. या क्षेत्रात येणाऱ्या उमेदवाराला घरातील सदस्यांपासून अनेक महिन्यांसाठी दूर राहावे लागते. त्यामुळे याची मानसिक तयारी असणे आवश्‍यक आहे. याखेरीज धैर्य आणि संघभावना असणे अतिशय आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)