मर्चंट नेव्हीत करिअर करायचंय? (भाग दोन )

जगभ्रमंती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. जर ही इच्छा जहाजावर राहून पूर्ण करता आली तर…? मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन असे करता येणे शक्‍य आहे. मर्चंट नेव्ही हा पूर्णपणे सिविलियन जॉब आहे. याच्या माध्यामातून विदेशात जाण्याची संधी मिळते. त्यामुळे भटकंती करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे. या क्षेत्रामध्ये करिअर केल्यानंतर केवळ चांगली कमाईच होते असे नाही तर अनेक रोमांचक अनुभवही या क्षेत्रात घेता येतात.

संधी – मर्चंट नेव्ही, मरिन इंजिनियरिंग अथवा शिप बिल्डिंगमध्ये संधींचा विचार केल्यास प्रामुख्याने शिपयार्ड, जहाज, मालवाहू जहाज आणि मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी शोधता येऊ शकते. या क्षेत्रातील उमेदवारांना भारताशिवाय इतर देशांध्येही मोठी मागणी आहे. शिप बिल्डिंग किंवा मरीन इंजिनियरवर जहाजाच्या इंजिनाच्या देखभालीची जबाबदारी असते. यासंबंधी कोर्सचे शिक्षण घेतल्यानंतर उमेदवाराला असिसस्टंट मॅनेजर, इंटर्न, शॉप फ्लोर एक्‍झिक्‍युटिव्ह या पद्धतीचा जॉब मिळू शकतो. तीन वर्षांच्या अनुभवानंतर उमेदवार डेप्युटी मॅनेजर होऊ शकतो. पूर्वी या क्षेत्रामध्ये केवळ पुरुष उमेदवारच येत असत. मात्र, आता महिलादेखील डॉक्‍टर किंवा रेडिओ ऑफिसर म्हणून या क्षेत्राकडे करिअर म्हणून गांभीर्याने बघत आहेत.

वेतन – मर्चंट नेव्हीमध्ये सर्व प्रकारच्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाते. डेक अथवा इंजिन विभागासी संबंधित प्रोफेशनल्सना करिअरच्या सुरुवातीच्या काळात 40 ते 50 हजार रुपये प्रति महिना देण्यात येतो. सर्व्हिस डिपार्टमेंटमधील उमेदवारांना सुरुवातीच्या काळात 15 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जातो. पद आणि अनुभव वाढल्यानंतर टेक्‍निकल टीम सदस्य 10 ते 15 लाख रुपये प्रति महिना देखील कमवू शकतो.

     या पदांवर मिळू शकते संधी

रेडिओ ऑफिसर – या पदावर राहून तुम्हाला डेकवर काम करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचे असते.

इलेक्‍ट्रिकल ऑफिसर – इंजिन रुमच्या इलेक्‍ट्रिकल सामानाची देखभाल करणे.

नॉटिकल सर्वेयर – समुद्राचे नकाशे आणि चार्ट तयार करणे.

पायलट ऑफ शिप – या पदावर काम करताना तुम्ही जहाजाची गती आणि दिशा ठरवू शकता.

उप-कप्तान – जहाजावरील कॅप्टनची मदत करणे आणि डेकवरील कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवणे.

कॅप्टन – जहाजावर नियंत्रण ठेवणारा. याशिवाय अतिरिक्त काही अन्य पदांवरदेखील काम करण्याची संधी मिळू शकते जसे

की, डेक ऑफिसर, इलेक्‍ट्रो-टेक्‍निकल ऑफिसर, इंजिनियर, केटरिंग व हॉस्पिटॅलिटी क्रू

   प्रमुख संस्था –

इंडियन मेरिटाइम यूनिव्हर्सिटी (चेन्नई)

हिंदी इंस्टीट्यूट ऑफ नॉटिकल सायंन्स अँड इंजीनियरींग (सिकंदराराऊ, उत्तर प्रदेश)

इंडियन इंस्टीस्टूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट (कोलकाता)

तुलानी मेरिटाइम इंस्टीट्यूट (पुणे)

आर. एल. इंस्टीट्यूट ऑफ नॉटिकल साइंसेंज (मदुराई)

कोचिन पोर्ट ट्रस्ट (कोचिन)

– सतीश जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)