मराठा समाज विकास फौंडेशनच्या अध्यक्षपदी रविंद्र बर्गे

फलटण ः रविंद्र बर्गे यांचा सत्कार करताना रविंद्र बेडकिहाळ, शेजारी बापूसाहेब मोदी, दत्ताजीराव सुर्यवंशी-बेडके, सुर्यकांत पवार, मनीष निंबाळकर.

फलटण, दि. 29 (प्रतिनिधी) – मराठा समाज विकास फौंडेशन, फलटणच्या अध्यक्षपदी रविंद्र तुकाराम बर्गे यांची नुकतीच निवड झाली.
यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत संस्थेचे सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ यांच्याहस्ते अध्यक्ष बर्गे व सचिव सूर्यकांत पवार यांचा सत्कार करण्यात आला. बापूसाहेब मोदी, यशवंतराव चव्हाण स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजीराव सुर्यवंशी-बेडके, मराठा समाज विकास फाउंडेशनचे सचिव सुर्यकांत पवार, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची उपस्थिती होती.
मराठा समाज विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मराठा समाजाबरोबरच अन्य समाजातील दुर्बल घटकांना सहकार्य करण्याबरोबरच रूग्णांनाही मदत करण्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. लवकरच पुणे,ठाणे व औरंगाबाद येथे शाखा स्थापन करून कामाला सुरूवात करणार आहे. श्रीराम विद्याभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना फौडेशनच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू असे उद्‌गार बर्गे यांनी काढले. हेमलता गुंजवटे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)