मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केवळ चालढकल

मराठा क्रांती मोर्चा : चंद्रकांत पाटलांकडून चळवळीत फूट पाडण्याचे काम


शांततेत आंदोलने आणि निवेदने न देता होणार आक्रमक


शासन निर्णयाच्या प्रती फाडल्या

मुंबई – मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार केवळ चालढकल करीत फक्त दिखावू आश्वासने देत आहे. मंत्री उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप करीत यापुढे आता मूकमोर्चे काढण्यात येणार नाहीत कि शांततेत निवेदने देण्यात येणार नाहीत.

आता फक्त आक्रमक होणार असा, इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला. भविष्यात मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असणार अशी समजही क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी देण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे-पाटील, माणिकराव शिंदे आदींनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. मराठा मोर्चानंतर सरकारने जे शासननिर्णय काढले होते, त्याच्या प्रतीही यावेळी फाडण्यात आल्या.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात मूकमोर्चे निघाले. मुंबईत विधिमंडळ अधिवेशन असताना 9 ऑगस्ट रोजी महामोर्चा निघाला होता. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेउन विविध घोषणा केल्या होत्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती देखील स्थापन करण्यात आली. मात्र, ठोस असे काहीच पदरात पडले नाही.

आरक्षणाच्या प्रमुख मागणीवर सरकार चालढकल करत आहे. जे काही शासननिर्णय निघाले ते आर्थिकदृष्टया मागासांसाठी निघाले. यापैकी एकातही मराठा समाज अशी नोंद नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करत आहेत. ते मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करीत चळवळ मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने त्यांना उपसमितीतून हटविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)