मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना पाडव्यादिवशी

पुणे – मराठा समाजाच्या नवीन पक्षाची दिवाळीत पाडव्याच्यादिवशी रायरेश्वर मंदिरात स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रूपाली पाटील, विठ्ठल पेडणेकर, परेश भोसले, वैशाली जाधव, मोहन मालवणकर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, या पक्षाचे कोणाकडेही अध्यक्षपद नसणार आहे. 100 जणांची कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. त्यात शेतकरी, वकील, उद्योजक, समाजसेवक आदींचा समावेश असणार आहे. प्रस्थापितांना डावलून आलेल्या आजी- माजी आमदारांना पक्षात घेण्यात येणार आहे. मराठा नेत्यांनी आम्हाला वापरून घेतले असून सत्ताधाऱ्यांबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा आमच्या पक्षाचा पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)