मराठा समाजाच्या आंदोलनास देहुकरांचा पाठिंबा

  • व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद

देहुरोड – मराठा समाजाच्या आरक्षणार्थ मराठा क्रांती मोर्चाला देहूकरांनी पाठिंबा देत देहू बंदचे आवाहन केले. बुधवार दि. 25 ला रिक्षा, हातगाडी, पथारीवाले, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चा यशस्वी होण्यासाठी औरंगाबाद येथे जल समाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राज्य शासनाचा निषेध नोंदवत मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. शिवसेनेचे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, रमेश हगवणे, संजय मोरे, भाजपाचे बाळासाहेब काळोखे, संजय जंबुकर, राष्ट्रवादीचे अभिमन्यू काळोखे, रामदास काळोखे, सोमनाथ चव्हाण, माणिक जाधव, शांताराम हगवणे, विठ्ठल काळोखे, शंकर काळोखे, संतोष शिंदे, देहू ग्रामपंचायतचे माजी सरपंच मधुकर कंद, तुकाराम काळोखे, विद्यमान सदस्य स्वप्नील काळोखे, अभिजित काळोखे, अजित काळोखे, उमेश मोरे, दत्तात्रय बांगर, पांडुरंग शेडगे, देविदास हगवणे, जयेश मोरे, अभिजित कंद व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देहू ग्रामपंचायत, शिवाजी चौक, धर्मवीर संभाजी चौक, महाद्वार चौक, डॉ. आंबेडकर चौक मार्गे मुख्य प्रवेद्वाराजवळ निषेध मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. राज्य शासनाने सकल मराठा क्रांती मोर्चाची मागणी त्वरित मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नावाचे निवेदन तलाठी अतुल गीते यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)