मराठा मोर्चा आंदोलन : पोलिसाचे डोके फोडले

पुणे,दि.31- मराठा मोर्चा आंदोलनादरम्यान मोबाइलवर शुटिंग घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्‍यात दगड घालण्यात आला. यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. डोक्‍यात दगड घालणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

सतीश ज्ञानोबा कामठे (32, रा. उरूळी देवाची) असे अटक व्यक्‍तीचे नाव आहे. तर दुचाकीवरील अन्य दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संदीप जमदाडे जखमी झाले आहेत. त्यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षणासंदर्भात हडपसर येथे काही संघटनांनी बंद पुकारला होता. यावेळी हांडेवाडी रस्त्यावरील हॉटेल समृद्धीसमोर काही कार्यकर्त्यांनी दुचाकी लावून रस्ता आडवला होता. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांची तीव्र घोषणाबाजी करत रस्ता अडवून ठेवला. या घटनेची शिपाई संदीप जमदाडे हे मोबाइलवर शुटिंग करत होते. हे लक्षात येताच आंदोलनातील काही कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावून आले. शुटिंग केल्याबद्दल त्यांना दमदाटी करत जाब विचारण्यात आला. यानंतर यातील एकाने त्यांच्या डोक्‍यात दगड घालून त्यांना जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शेंडगे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)