मुंबई – मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार केवळ चालढकल करीत फक्त दिखावू आश्वासने देत आहे. मंत्री उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप करीत यापुढे आता मूकमोर्चे काढण्यात येणार नाहीत कि शांततेत निवेदने देण्यात येणार नाहीत. आता फक्त आक्रमक होणार असा, इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.
1 मे ते 5 जूनपर्यंत राज्यभरात बैठका, सभा, आक्रोश मेळावे होणार आहेत. त्यात मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. आमदारांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चामध्ये सरकारने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये. “मराठा क्रांती मोर्चा’ हे नाव कोणत्याही पक्षसंघटनेला वापरता येणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा