मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उद्या खेड बंदची हाक

आळंदी- सकल मराठा क्रांती मोर्चाने सोमावारी (दि. 30) खेड तालुका बंदची हाक दिली आहे. सरकार दरबारी मराठा आरक्षणाबाबत उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी तसेच गंगापूर तालुक्‍यातील कै. काकासाहेब शिंदे या तरूणास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खेड तालुका बंदची हाक दिली असून आळंदीत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आळंदी देवाची सकल मराठा क्रांतीमोर्चाने स्पष्ट केले आहे. तरी आळंदीतील सर्व व्यापारी, व्यावसायिक, दुकाने, मंदिर परिसरातील फुलविक्रेते आदींनी बंदमध्ये सहभागी व्हावे व आपली दुकाने बंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये अत्यावश्‍यक सेवा, दवाखाना, मेडिकल, शाळांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, या मोर्चाची सुरुवात चाकण चौक येथून सकाळी 10 वाजता काढण्यात येणार असून मरीआई चौकात रस्तारोको आंदोलन होईल, त्यानंतर दुपारी 12 वाजता नगरपालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार व वंदन करून मोर्चाची सांगता होणार आहे. हा निषेध मोर्चा शांतपणे कोणत्याही घोषणाबाजी न करता होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)