मराठा आरक्षण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा – सुरेश धस

बीड – सध्याची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण हा संवेदनशील मुद्दा होत चालला आहे. याबाबत न्यायालयात सुरु असलेली सुनावणी ही फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी केली. इतर संवेदनशील प्रकरणांप्रमाणेच मराठा आरक्षणाची सुनावणीही फास्ट ट्रॅक कोर्टात करा आणि निर्णय जाहीर करा, असे ते म्हणाले.

सुरेश धस यांनी परळीतील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आरक्षणासंदर्भातील खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याची मागणी केली.
गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत आंदोलन सुरु आहे. या समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी मी समाजासोबत आहे, असे धस म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“महाराष्ट्रात मराठा समाज 32 टक्के आहे. सध्या या समाजामध्ये चीड आहे. तरुण आक्रमक झाले आहेत. समाजमन हलले आहे. त्यामुळे हा विषय संवेदनशील होत आहे. त्यामुळे अन्य संवेदनशील विषयावर जसा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तातडीने मार्ग काढला जातो.

तसाच हे प्रकरणही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. यामुळे जो काही निर्णय येईल तो तातडीने येईल. तसेच सरकारने कोर्टात जे अडीच हजार पानी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, ते पण ऑनलाईन उपलब्ध करावे, जेणेकरुन सरकारची भूमिका सर्वांसमोर येईल, असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, परळीच्या ठिय्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार, भाई जगताप, आमदार सुरेश धस यांनी भेटी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)