मराठा आरक्षणासाठी सासवडला महामोर्चा

सासवड- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सासवडसह पुरंदर तालुक्‍यात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता सासवड नगरपालिकेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे-सासवड-जेजुरी महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच स्व. काकासाहेब शिंदे व स्व. सोनावणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुरंदर मधील सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या शुक्रवारी (दि. 27) तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला पुरंदर तालुक्‍यातून चांगला प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाजवळील मैदानात दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, सासवडचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)