मराठा आरक्षणासाठी सहा आमदारांचे राजीनामे

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध पक्षातील आमदारांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली. सत्ताधारी भाजपचे नाशिकमधील आमदार डॉ. राहुल आहेर आणि आमदार सीमा हिरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बुधवारी दोन तर गुरूवारी चार आमदारांनी राजीनामे दिले.

आमदार राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला. समाज मोठा असल्याने हे राजीनामे त्यांच्याकडे दिल्याचे राहुल आहेर आणि सीमा हिरे यांनी सांगितले.
मंगळवेढा मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार भारत भालके यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा, धनगर, मुस्लिम आणि महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे भारत भालके यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला. रमेश कदम हे सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत. दुसरीकडे, औरंगाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, कन्नड मतदारसंघातील शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही मराठा आरक्षणाची मागणी करत बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

चौकट
“तो’पर्यत आमदारकी कायम राहणार – हरिभाऊ बागडे
मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर आमदारांनी राजीनामा दिला असला, मात्र हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा स्वीकारता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले आहे. पुढच्या अधिवेशनापर्यंत (हिवाळी अधिवेश) आमदारकी कायम राहणार आहे. विधिमंडळ नियमांनुसार राजीनामा दिलेल्या सदस्यांचे राजीनामा सभागृहात वाचून दाखवले जातात. त्यानंतर कारणी नमूद करुन ते स्वीकारले किंवा फेटाळले जातात, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)