मराठा आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा

राष्ट्रवादीची मागणी
मागासवर्ग आयोगाचीही घेतली भेट

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. 52 टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लावता राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण लागू करावे. त्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. तसेच मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी मागासवर्ग आयोगाने तातडीने अहवाल द्यावा, असे साकडे आयोगाकडे घालण्यात आले.

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यानंतर राज्यमागास आयोग अध्यक्ष आणि राज्यपालांना निवेदन देत मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्याची मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे तीव्र आंदोलन सुरु आहेत. हे आंदोलन गावागावात पोहोचले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलकांच्या मागण्या रास्त आणि भावना तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी 57 मुक मोर्चे काढण्यात आली, धरणे आंदोलने करण्यात आली. नुकतेच पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पाच जणांनी आत्मबलिदान दिले. त्यात एका पोलीसाचाही मृत्यू झाला, हे दुर्देवी आहे. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत, त्यासाठी आपण हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

मुख्यमंत्री व त्याच्या सहकारी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन चिघळले होते. त्याचाच फटका मुख्यमंत्र्यांना बसला. पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना रोखण्यात आले, याकडेही राष्ट्रवादीने राज्यपालांचे लक्ष वेधले.

आघाडी सरकारच्या काळात राज्यात अस्तित्वात असलेल्या 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता या समाजाला 9 जुलै 2014 रोजी 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. आता हेच आरक्षण तात्काळ लागू करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी मागासवर्ग आयोगकडे करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)