मराठा आरक्षणासाठी नायगाव येथे रास्ता रोको

नायगाव- पुरंदर तालुक्‍यातील नायगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सासवड-सुपा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरवात करण्यात आली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने हातात भगवे झेंडे घेउन, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत, रास्ता रोको आंदोलन केले. गावातील सर्व व्यवसायकांनी आपली दुकाने बंद ठेवुन आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाच्या लढ्यात हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)