मराठा आरक्षणासाठी कळंब बंद

मंचर- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. 26) आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथे गावबंद आंदोलन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला. उद्योजक नितीन भालेराव आणि माजी सरपंच बाळशिराम भालेराव यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी गावात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
कमलजादेवी क्रीडा मंडळ, समस्त ग्रामस्थ आणि विविध संस्था, संघटनाच्य वतीने एक दिवसीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लोकांनी स्वतःहून दोन तास दुकाने बंद ठेवून बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. यावेळी आंदोलकांनी कळंब चौकातून संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली. यावेळी अक्षय भालेराव, प्रमोद भालेराव, कैलास भालेराव, हर्षल भालेराव, अभिजीत वाईकर, अमित वर्पे, संतोष कहडणे, मनसेचे शाखा प्रमुख प्रवीण भालेराव, कमलेश वर्पे, रोहन भालेराव, सुनील भालेराव, राजेंद्र भालेराव, संदीप वर्पे, कुमार वर्पे, योगेश वर्पे, सुनील भालेराव, संतोष भालेराव, महेश भालेराव, बंटी गोसावी, सुरज वायाळ, सागर भालेराव सहभागी होते. बंद दरम्यान मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस कर्मचारी विनोद गायकवाड, एस. एम. मडके व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)