मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारची धावाधाव

सर्वपक्षीय बैठक !
मुंबई – गेली दोन-अडीच वर्षे शांततेत आंदोलन करूनही आरक्षणचा विषय मार्गी लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या मराठा समाजाच्या संयमाचा उद्रेक झाल्याने तापलेले वातावरण शांत करण्यासाठी आता सरकारची धावपळ सुरु झाली आहे. आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलने चिघळले आहे. लाखोंचे 58 मूक मोर्चे काढूनही प्रश्न न सुटल्याने मराठा तरुण आक्रमक झाला असून मागच्या आठवड्यात राज्यभरात त्याचे हिंसक पडसाद उमटले. सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी त्याची धग अजूनही शमलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा व विधानसभा निवडणुका वर्षभरावर आलेल्या असताना मोठ्या समाजातील वाढता असंतोष व कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री विनोद तावडे यांच्या “सेवासदन’ या शासकीय निवसस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत मराठा समाजाच्या असंतोष कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)