मराठा आमदारांची बैठक बोलवा

आमदार शंभूराज देसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसोबत सर्व मराठा आमदारांची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात देसाई यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मराठा समाजातील सर्वपक्षीय आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना बैठकीबाबत विनंती करावी. या बैठकीतून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला गती मिळू शकेल, असे देसाई यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात 58 मोर्चे निघाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता मात्र आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटला आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व आमदारांनी विधानसभेत वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसोबत मराठा समाजातील तमाम आमदारांची बैठक आयोजित करावी, असे अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)