मराठा आंदोलनात दाखल केसेस पुणे बार असोसिएशन मोफत लढणार

आंदोलनाला पाठींबा : अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांची माहिती

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राजव्यापी आंदोलनास पाठींबा दिला आहे. आंदोलन काळात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस बार असोसिएशनकडून मोफत लढविल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी दिली.
सध्या सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलनास पाठींबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखला आहेत. त्या आंदोलन कर्त्यांनी याबाबतची माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनला द्यावी, असे आवाहन ऍड. पवार यांनी यावेळी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)