मरणासन्न रुग्णांच्या बाह्योपचार थांबवण्यास मंजूरी

यापुढे परवानगीची आवश्‍यकता नाही – इंग्लंडच्या न्यायालयाचे स्पष्टिकरण

लंडन – मरणासन्न अवस्थेतील रुग्णांचे बाह्योपचार थांबवण्यास जर नातेवाईक आणि डॉक्‍टरांची परवानगी असेल, तर त्यासाठी यापुढे न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता नसेल. इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या निकालामध्ये ही बाब स्पष्ट केली आहे. यामुळे अशा रुग्णांचे अन्न-पाणी थांबवून मृत्यू स्वीकारण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. रुग्णांना अन्न पुरवणाऱ्या नलिका हटवण्यास हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे,असा निकाल लेडी ब्लॅक यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या पिठाने दिला. पूर्वी अशा प्रकरणांमध्ये रुग्णांच्या मृत्यूबाबत निर्णय घेण्याची परवानगी नाकारली गेली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या सुखाचे मरण किंवा दया मरण (युथॅन्सेसिया) आणि मृत्यू सहायता या दोन्ही गोष्टींना इंग्लंडमध्ये कायदेशीर परवानगी आहे. केवळ ज्या उपचारांमुळे रुग्णाची आयुमर्यादा वाढू शकत असेल, असे उपचार न थांबवण्याचा अपवाद या कायद्यांतर्गत आहे.

डॉक्‍टर आणि रुग्णाचे निकटचे नातेवाईक यांच्यातील करारानुसार जनतेला विश्‍वासात घेतले जावे. मानवी हक्क विषयक युरोपियन ठराव आणि सर्वसाधारण कायद्याद्वारे प्रत्येक प्रकरणांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करायला लावला जाऊ नये. हा निर्णय डॉक्‍टर आणि नातेवाईकांनी मिळून घ्यावा. मात्र मतभिन्नता असेल, तर न्यायालयाद्वारे निवाडा करावा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)