मरकळ-तुळापूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

चिंबळी- खेड व हवेली तालुक्‍यात असलेल्या मरकळ ते तुळापूर रस्त्यावर असलेल्या इंद्रायणी नदी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य कायमच असून प्रवासी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
श्रीक्षेत्र आळंदी ते लोणीकंद येथे पुणे-नगर मार्गाला जोडणाऱ्या रत्सावर लोणीकंद फाटा या मार्गावरील जोडणाऱ्या मरकळ-तुळापूर आळंदी रस्त्यावर असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल ते श्रीक्षेत्र तुळापूर प्रवेशद्वारातच सुमारे एक किलोमीटर रस्त्याची पुलासह दुरवस्था झाली आहे. इंद्रायणी नदी पुलावरून ये-जा करणे धोक्‍याचे व आरोग्याचे दृष्टीने गैरसोयीचे झाले आहे. यामुळे मरकळ इंद्रायणी नदी पूल ते तुळापूर प्रवेश या दरम्यान वाहनचालक, दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. यातून परिसरातील नागरिकांमध्येही नाराजी आहे. अनेक वेळा या भागातील रस्ता कामाचे भूमिपूजन झाले. मात्र मरकळ इंद्रायणी नदीवरील पूल ते तुळापूर प्रवेश लगतच्या सुमारे एक किलोमीटर या रस्त्याची दुरवस्था दूर न झाल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी, वाहन चालक यांच्यात नाराजी वाढली आहे. रस्त्याचे दुतर्फा बाजूची गटर्स देखील पाण्याचे निचरा योग्य नसल्याने तेथे सांडपाणी साचून जागेवरच राहत आहे. या मार्गावरील प्रचंड रहदारी व उतार याचा विचार करून मजबूत रस्त्याची निर्मिती करण्याची गरज वाहन चालकांतून व्यक्त होत आहे. या रस्त्यावर वळण व उतार तसेच येथून ये-जा करताना धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्याने रहदारी असुरक्षित झाली आहे. खेड व हवेली बांधकाम उपविभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी माहिती सेवा समितीचे प्रमुख शंकर लोखंडे यांनी केली आहे.
तुळापूर (ता. हवेली) ःया मार्गावरील मरकळ इंद्रायणी नदीवरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.