ममता विरूद्ध सीबीआय : पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर हजर रहावे- सर्वोच्च न्यायालय 

नवी दिल्ली –  कोलकाता पोलीस आयुक्‍तांच्या विरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेली असून त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी करण्यात आली. यावेळी कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिला आहे. तसेच राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे असे सांगत सीबीआयनेही त्यांना अटक करू नये, असे निर्देश दिले आहेत.

सीबीआयने रोझ व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळ्यांवरून कुमार यांना समन्स बजावले आहे. मात्र, राजीव कुमार हे सीबीआयला सहकार्य करीत नाहीत. त्यांना सहकार्याबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी सीबीआयने याचिकेत केली होती. तसेच चिडफंड घोटाळ्यातील पुरावे त्यांनी नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने याचिकेत केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)