मन की बात; पंतप्रधानांकडून राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे कौतुक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या 43व्या भागातून भारतीयांना संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात करतात. मन की बातच्या सुरुवातीला मोदींनी कॉमनवेल्थ गेममध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. जलसंरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे, असेही मोदी म्हणाले आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पटकावलेली ६६ पदके आणि मिळवलेले तिसरे स्थान खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यामध्येही त्यांनी कुस्ती, शूटींग, बॅडमिंटन, टेबल-टेनिस या खेळांचा विशेष उल्लेख करत महिला खेळाडूंचे खास कौतुकही केले.  याबरोबरच आपण आधीच्या मन की बातमध्ये फिट इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते आणि त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत याबाबत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमातील योगदानाबद्दल त्यांनी अभिनेता अक्षय कुमारचे कौतुकही केले. तसेच २१ जून रोजी असणाऱ्या योगा दिवसाची तयारी सर्वांनी सुरु केली असेल अशी आशा व्यक्त केली.

भारत सरकारचे स्पोर्ट्स, एचआरडी आणि पाणीपुरवठा या तीन मंत्रालयांनी मिळून स्वच्छ भारत समर इंटर्नशिप 2018चं आयोजन केलं आहे. त्यामुळे या इंटर्नशिपमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. बरीचशी नावाजलेली लोक #FitIndiaच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित करत असतात ते पाहून खूप बरे वाटते. अभिनेता अक्षय कुमारनंही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो wooden beadsसह व्यायाम करताना पाहायला मिळत आहे. हा व्यायाम पाठ आणि पोटासाठी फायदेशीर आहे, असेही मोदी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)