मनोरुग्ग्णांसाठी अटेंडंट नसल्याने ऑपरेशन लांबणीवर?

ससूनमधे अनेक दिवस रुग्णांचा मुक्‍काम : मनोरुग्णालयाने आरोप फेटाळले

पुणे,दि.27 – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचारासाठी ससून सर्वोपचार केंद्रात येणारे रुग्ण हे अनेकदा अटेंडंट (रुग्णाची काळजी घेणारा परिचारक)अभावी ऑपरेशन थिएटरपर्यंत जातच नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या रुग्णांचा मुक्‍काम ससूनमध्येच असतो, असे ससूनमधील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. तर, प्रत्येक रुग्णामागे एक अटेडंट पाठवत असल्याचे मनोरुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येरवडा मनोरुग्णालयात दाखल रुग्णांना विविध आरोग्य सेवांसाठी ससूनसारख्या मोठ्या रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते. अनेकांच्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात होतात. यासाठी येरवडा मनोरुग्णालयातून हे रुग्ण ससूनमध्ये पाठविले जातात. यांच्याबरोबर मनोरुग्णालयातून एक अटेंडंट पाठविला जातो. मात्र अनेकदा हे अटेंडंट मनोरुग्णांजवळ थांबतच नाही. त्यामुळे या रुग्णांबाबत जे काही औषध किंवा ऑपरेशनची वेळ आदी गोष्टी ठरवायच्या असतात, त्यावेळी अटेंडंट नसल्याने अनेकदा ही ऑपरेशन पुढे ढकलली जातात, अशी माहिती खासगीत ससूनमधील काही डॉक्‍टरांनी दिली. ते म्हणाले, अनेकदा आम्ही ऑपरेशनची वेळही ठरवतो. काही वेळा रुग्ण हा रिकाम्यापोटी असणे गरजेचे आहे. मात्र, ते ऑपरेशन दिवशी सकाळीच भरपेट खाऊन घेतात. याबाबत अटेंडंट पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच ही ऑपरेशन पुढे ढकलली जातात. त्यामुळे ससूमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढते.

मनोरुग्णालयातून पेशंट ससूनमध्ये पाठविण्यात येतात, त्यावेळी रुग्णाबरोबर एक अटेंडंट दिला जातो. ते 24 तास रुग्णाबरोबर असतात. यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुपरवायझरचीही नेमणूक केलेली असते. तेही अचानक भेट देऊन तपासणी करतात. त्यामुळे हे आरोप आम्हाला मान्य नाहीत.
– डॉ. अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)