मनात श्रद्धाभाव असल्यास अडचणीवर मात करणे शक्‍य

मंचर- मनात श्रद्धाभाव असल्यास कोणतीच अडचण येत नाही. फक्त मनात इच्छाशक्ती असली पाहिजे. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. परंतु, कोणामुळे तरी आपण मोठे झालो याचा विसर माणसाला पडतो. अशी खंत योगी रविनाथजी उर्फ खडेश्‍वरी महाराज यांनी व्यक्त केली.
अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीवर गुरूपोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी योगी रविनाथजी महाराज उर्फ खडेश्‍वरी महाराज यांचे पुजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना खडेश्‍वरी महाराज बोलत होते. यावेळी उद्योजक मिलिंद खुडे, जागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश भोर, जयराम मोटवाणी, किशोर अडवाणी, भरत सोनी, योगी कृष्णनाथजी, योगी मिर्चीनाथजी, योगी गहिनाथजी, योगी जागनाथजी, योगी तुफाननाथजी महाराज, डी. के. वळसे पाटील, रामदास टेके यांच्यासह मध्यप्रदेश राजस्थान, कर्नाटक, गुजरात, हरियाणा येथील भक्त उपस्थित होते.
योगी रविनाथजी उर्फ खडेश्‍वरी महाराज यांनी समाजात असणाऱ्या अंधश्रद्धेबाबत परखड शब्दात सांगितले की, समाजात अंधश्रद्धा असल्यामुळे अजुनही आजारी पडल्यास डॉक्‍टरांकडे जात नाहीत. अंगारा, धुपारा लावुन आजार बरा होत नाही. साप चावल्यास मंदीरात जावुन बसतात. तेथे विष उतरत नाही. विष चढुन मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरूपोर्णिमानिमित्त गुरूंनी दिलेल्या शिकवण आचरणात आणली तर जीवनाचे सार्थक होते. राग, लोभ, मच्छर यामुळे माणुस हा विकृत बनत चालला आहे. जीवन हे अनमोल असून त्याचे महत्व तरूण पिढीला सांगण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)