मनाचे रहस्य ः मिस्टरी ऑफ दि माइंड

सुरेश परुळेकर

ही 1980 मधली गोष्ट. डॉ. इयान स्टीव्हनसन पॅरासायकॉलॉजिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते व्हर्जिनिय विद्यापीठातील मेडिकल सेंटरमधील मानसोपचाराचे प्राधायापकही होते. तसेच, ते व्यक्तिमत्त्वविषयक अभ्यासाचेही संचालक होते. डॉ. इयान स्टीव्हनसन म्हणतात की, मनाचे सहा गुणधर्म आहेत. त्यापैकी एक जरी वगळला, तरी मनाचे “मनपण’ हरवते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1. मन अवकाश (स्पेस-SPACE) व्यापते. मन प्रतिमा (फॅंटसी- FANTASY) विलक्षण कल्पाना करू शकते. मी मनाच्या अवकाशास- मानसिक अवकाश (इंटरनल स्पेस) ही संज्ञा देतो. यात आपले सर्व अनुभव येत असतात. भौतिक अवकाश वेगळा. तो मानसिक अवकाशापेक्षा लहान असतो.

2. भाव-भावना हा मनाचा दुसरा गुणधर्म- प्रत्येक अनुभव हा कमी-अधिक सुख-दुःख- भावात्मक असतो. एका अनुभवाची उत्कटता, दुसऱ्या अनुभवाने कधीही नष्ट होत नसते. या गोष्टीला फार महत्त्व आहे.

3. स्मृती हा मनाचा तिसरा गुणधर्म होय. स्मृती दोन वर्गात टाकता येतात.
अ) व्यक्तिगत अनुभवांच्या स्मृती- या स्मृती कधी आपोआपही येऊ लागतात; तर कधी इच्छापूर्वक आणता येतात.
ब) वर्तन अथवा क्रिया यांच्या रूपाने राहिलेल्या स्मृती- उदाहरणार्थ- आपले चालणे, बोलणे, लिहिणे, सायकल/गाडी चालविणे, जेवणे, वस्तू हाताळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे मुद्दाम लक्ष द्यावे लागत नाही.

4. प्रयोजन (पर्पझ PURPOSE) (फार महत्त्वाचा गुणधर्म) मनामनांचे संबंध प्रयोजनांमुळेच प्रस्थापित होतात. आपल्या लॉजिकल (तर्कयुक्त) निर्णयांचे मूळही आपल्या प्रयोजनांमध्येच असते. प्रयोजनांवरच आपल्या स्नेह संबंधांची उत्कटता अवलंबून असते. मनोमन संप्रेषण (टेलिपथिक कम्युनिकेशन) हे ध्वनी, शब्द, हावभाव इत्यादीवाचून होते.

5. एकता हा मनाचा पाचवा गुण. मन सतत “एक’ होण्याचा, विभाजन होऊ न देण्याचा प्रयत्न करते. आपण मामसाला दोन “मने’ (MINDS) असे मानतो. ही दोन मने, एकमेकांशी संवाद साधतात व एका निर्मयापर्यंत येतात. “मना’ला तुकडे पाडलेले आवडत नाही. Mind tries to be one. मन हे सरोवर आहे. (Lake) असे मानले तर, ते पृष्ठभागावरचे तरंग आपोआप दूर करते व संथ/निश्‍चल होण्याचा प्रयत्न करते.

6. जाणीव (कॉन्शसनेस/अवेअरनेस म्हणजे बोध, भान, संवेदन, थोडक्‍यात आपल्यामध्ये, निर्णय घेणारे, विश्‍वास बाळगणारे – असे जे काही असते, ते मन. मेंदू हा मनाचा संदेशवाहक आहे. कोणती गोष्ट करावयाची हे मनाकडून मेदूंस सांगितले जाते. मेंदू (बुद्धि) सुस्थितीत असेल तर तो त्या गोष्टी करतो. मन व बुद्धी सजग (Lake) असावीच लागतात. बुद्धिनाशानेच व्यक्तीचा नाश होतो. “मन’ खूप चांगले असेल, पण बुद्धि फिरली म्हणजे संपलंच.

मुख्य म्हणजे, मन व मेंदू- वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा (Energy) वापरतात व त्यांच्यामध्ये (सतत) आंतरक्रिया चालत असते. कशाकडे लक्ष द्यावयाचे हेही मनच ठरविते. म्हणजेच मन हे मेंदूहून निराळे आहेच, पण शिवाय ते श्रेष्ठही आहे. आपला “स्व’ म्हणजे आपले चेतनात्मक अस्तित्व. झोप लागली की त्या “स्व’च्या अस्तित्वाचा मेंदूशी असलेला संबंध सुटतो. मन म्हणजे माणसामागचा माणूस- खुद्द मज्जा वैज्ञानिक- न्युरॉलॉजिस्टस्‌ असलेले सर जॉन एकल्स व डॉक्‍टर विल्डर पेनफील्ड म्हणतात की, मज्जाविज्ञान (न्युरॉलॉजी) हे मन व मेंदूविषयींच्या समस्या सोडविण्यास असमर्थ आहे. कुणी म्हणतात की मन हे एक द्रव्य (substance) असून, त्याची विशिष्ट रचना असते… काही व्यक्तींची मने, विशिष्ट परिस्थितीत, दुसऱ्या व्यक्तींच्या जीवनात डोकावू शकतात.

आजच्या घटकेला, डॉ. एनफील्ड यांचे ठाम प्रतिपादन लोकांना पसंत पडले. ते म्हणजे – सत्य आणि असत्य, शिव आणि अशिव हे भेद मनच करते. विश्‍वास, संकल्प, निर्णय या गोष्टी मनामुळेच संभवतात. मन हे मेंदूचा उपयोग किंवा दुरुपयोग करू शकते. मन म्हणजेच माणसामागचा माणूस. मनाची कारकशक्ती किंवा सायकोकायनेसिस म्हणजे जिद्द “करीन ती पूर्व’ हा सूर.

संकल्पबल – strong will power पण त्या प्रयत्नांच्याही पलीकडे जाऊन, केवळ संकल्पबलाच्या जोरावर इच्छा बळाच्या जोरावर “विल पॉवर’च्या जोरावर, सिद्धी मिळविणे, हे मात्र अगाध व अनाकलनीय आहे. इंदियंच्या मध्यस्थीविना, संवेदन होण्याची चक्षमता (Ability) माणसाच्या ठायी असते. हे प्रयोगांनी सिद्ध केले गेले व त्यातून माणसाचे मन, स्नायूंच्या साहाय्याविना, परिसराशी क्रियात्मक संबंधदेखील ठेवू शकेल, ही कल्पना ओघानेच आली.

संकल्पबलाचा जैव द्रव्यावर (Biofluia) परिणाम होतोच चित्ताच्या प्रसन्नतेचा बरा-वीाट परिणाम होतो, हे कित्येकांनी पाहिले आहे. त्याला “नजर लागली’ दृष्ट लागली असे म्हटले जाते. तेव्हा मनाचे रहस्य म्हणजे माणसामागचा माणूस- Human Soul behind Man व त्याचे संकल्पबल संकल्पबल म्हणजे मनोकामना, अंतःस्फूर्ती, निर्धार उदक सोडणे- “मला दुसरं काहीही को, फक्त हेच पाहिजे’ सत्यसंकल्पनाचा दाता- नारायण -Wery Strong Will Power – असा संकल्प सोडला, सर्वावर उदक सोडलं तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास “याचि जन्मी, याचि डोळा’ होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)