मध्यप्रदेशातील मंदिरातून चोरीला गेले 15 कोटींचे सोने

शिवपुरी – मध्यप्रदेशातील शिवपुरी येथील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातील पंधरा कोटी रूपयांचे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. गावच्या नगरपंचायतीचे अध्यक्ष शैलेंद्रसिंह जुदेव यांच्या लक्षात ही घटना आली.

मंदिराचा पंधरा कोटी रूपयांचा सोन्याचा कळसच चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिली. त्यानंतर गावात खळबळ माजली आणि लोकांनी तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांनी श्‍वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. हे मंदिर तीनशे वर्ष जुने आहे. त्यावर 55 किलो वजनाच्या सोन्याचा कळस चढवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंद पाळून आपला रोष प्रकट केला. पोलिसांनी याविषयी माहिती देणाऱ्यांना दहा हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)