मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्याचे केवळ १३ रुपयाचे कर्जमाफ 

File photo

नवी दिल्ली – मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे समोर येत आहे. मालवा जिह्यातील बैजनाथ निपानिया गावातील एका शेतकऱ्याच्या नावे २० हजार होते. मात्र त्याचे केवळ १३ रुपयेच माफ करण्यात आले.

शिवलाल कटारिया यांनी सांगितले कि, सरकारने दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. मी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व कर्ज माफ होईल, अशी आशा होती. माझे नावही लाभार्थींच्या यादीत आले. परंतु, केवळ १३ रुपये कर्जमाफ करण्यात आले. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो. याबाबत संबंधित आधिकाऱ्याकडे तक्रार देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1088312460359098368

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)