मधुश्री व्याख्यानमालेचे 10 व्या वर्षात पदार्पण

निगडी – मधुश्री व्याख्यानमालेने 10 व्या वर्षात पदार्पण केले असून या वर्षीच्या व्याख्यानमालेचा उद्‌घाटन समारंभ शुक्रवारी दि. 25 रोजी विदर्भ सहयोग मंडळ सिंधूनगर प्राधिकरण निगडी येथे अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकणीस यांनी शोधा म्हणजे सापडेल या विषयावर व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफले. वाकणीस म्हणाले की, दैनंदिन व्यवहारात आपली एखादी वस्तू हरवली की, आपण ती शोधतो आणि सापडली की आनंद व्यक्त करतो. आणि जर नाही सापडली तर त्याची उणीव भासते व कालांतराने त्याबद्दलची ओढ कमी होते. पण समजा आपण स्वतःचं हरवलो तर? अनेक वेळा मी कोण आहे? असा अनेकांना प्रश्न पडतो. या एका प्रश्नासाठी अनेक लेखकांनी लिखाण केले आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली याचे रहस्य उलगडण्याच्या प्रयत्न ऋषीमुनींनी केला आहे. वैज्ञानिक अजून या गोष्टीचा शोध घेत आहेत. अध्यात्म हे ज्ञान क्षेत्र आहे धार्मिक हे कर्मकांड क्षेत्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ प्रभाग अध्यक्ष पि. चि. मनपा अनुराधा गोरखे , तर प्रमुख पाहुणे म्हणून बीबीएन पिंपरी चिंचवडचे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी, मधुश्री कलाविष्काराच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार उपस्थित होते. माधुरी ओक प्रास्ताविकमधे म्हणाल्या मधुश्री कलाविष्कार ही संस्था नाट्य संगीत चिञकला निंबध स्पर्धा एकांकीका अभिवाचन स्पर्धा अश्‍या प्रकारचे उपक्रम राबविते.

अध्यक्षीय मनोगतामधे गोरखे म्हणाल्या की, या संस्थेमार्फत अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवले जातात आणि यापुढेही त्यांनी अश्‍याच प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलकर्णी म्हणाले, आपण ठरलेले मजले चढत जातो पण त्याची किल्ली मात्र खालीच राहते. आज नक्कीच वाकणीस यांच्या व्याख्यानातून आपल्या हवे असलेली गोष्ट सापडेल अशी आशा आहे.

यावेळी राजेंद्र घावटे, सुभाष चव्हाण, अरविंद वाडकर, शोभा जोशी, अंतरा देशपांडे, माधुरी विधाटे, नंदकुमार कांबळे, सविता इंगळे अशी साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या संयोजनात राज अहेरराव, राधिका बोर्लिकर, अजित देशपांडे, नीता वैद्य यांनी सहकार्य केले. सूञसंचालन उज्वला केळकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)