मदरशातील मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मौलानाच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – कात्रज भागातील जामीया अरबिया दारूल यतामा या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 2 मुलांवर लैंगिक आत्याचार केल्याप्रकरणी मौलानाच्या पोलीस कोठडीत 2 ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही. अदोने यांनी दिला आहे. पीडित मुलांचे जबाब घेण्यासाठी बालकल्याण समितीला अद्याप आदेश प्राप्त झालेला नाही. समितीने लेखी पत्रव्यवहाराद्वारे 14 मुलांचे जबाब प्रश्‍नोत्तर स्वरूपात नोंदवले आहेत. उर्वरित मुलांचे जबाब नोंदविण्यासाठी, पीडित मुले आणि त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, तसेच त्या मदरशात 36 मुले आढळून आले आहेत. त्यापैकी एका पाच वर्षाच्या मुलाला लगेच परत पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर अत्याचार झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, याबाबत तपास करण्यासाठी, तसेच तो इतर ठिकाणीही शिकवायला जात होता. तेथे अशा प्रकारचे कृत्य केले आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.
हाफीज अब्दूलरहिम गुलामरब्बानी शेख (वय 21, रा. सध्या रा. कोंढवा, मुळ रा. बिहार) असे पोलीस कोठडीत वाढ केलेल्या मौलानाचे नाव आहे. पीडित चिमुरड्यांनी याबाबत एका संस्थेकडे वाच्यता केल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री (दि. 27 जुलै) उशीरा भारती विद्यापीठ पोलिसांत बालकांचे लैगिंक आत्याचारापासून संरक्षण अधिनीयम कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल झाला आहे. बालहक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अद्वैत अडबे (वय 54) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. अटक करून शेख याला शनिवारी (दि. 28 जुलै) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)