मदतनिधी सामन्यात रशीद, शकिब खेळणार

दुबई  – अफगाणिस्तानचा नवा स्टार गोलंदाज रशीद खानसह बांगला देशचा कर्णधार तमिम इक्‍बाल आणि अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन या खेळाडूंनी वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या मदतनिदी सामन्यासाठी आपला सहभाग निश्‍चित केला आहे.

वेस्ट इंडीजमध्ये गेल्या वर्षी झालेल्या भयानक वादळामुळे समुद्रकिनारी असलेल्या अनेक क्रिकेट स्टेडियमचे अपरिमित नुकसान जाले आहे. या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यासाठी मदतनिधी उभारण्याकरिता येत्या 31 मे रोजी ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आयसीसी जागतिक संघ विरुद्ध वेस्ट इंडीज संघ यांच्यात होणाऱ्या या लढतीसाठी रशीद, तमिम व शकिब यांचा जागतिक संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक यांच्यासह श्रीलंकेच्या थिसारा परेरानेही जागतिक संघातील आपला सहभाग निश्‍चित केला आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंडचा एकदिवसीय कर्णधार इयान मॉर्गनसह इतरही अनेक बड्या खेळाडूंनी या मदतनिधी सामन्यात खेळण्यास उत्सुकता दाखविली आहे. वेस्ट इंडीजने 1970 व 80च्या दशकात गाजविलेल्या कर्तृत्वामुळे जगातील अगणित खेळाडू क्रिकेटकडे खेचले गेले आहेत व त्यांना प्रेरणा मिळाली आहे, असे सांगून रशीद म्हणाला की, अशा वेस्ट इंडीजला साहाय्य करण्यासाठी माझी निवड झाली असल्याचा मला अभिमान वाटतो.

तमिम इक्‍बाल म्हणाला की, या सामन्याच्या निमित्ताने जागतिक संघात खेळण्याची संधी आणि बहुमान मिळाला असल्याचा मला विशेष आनंद वाटतो. याआधी केवळ 2010 मध्ये मला तशी संधी मिळाली होती. इतकेच नव्हे तर लॉर्डस मैदानावर खेळण्याची संधी मिळण्याची जगातील प्रत्येक क्रिकेटपटूला प्रतीक्षा असते. त्यातच जागतिक क्रिकेटसाठी वेस्ट इंडीजचे योगदान केवळ असामान्य असेच आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजसाठी जगातील सर्व क्रिकेटपटू एकत्र येऊन काहीतरी करीत असतील, तर त्यालाही वेगळा अर्थ आहे.

या मदतनिधी सामन्याच्या निमित्ताने जागतिक क्रिकेटपटू एकत्रितपणे खेळणार आहेत ही विशेष घटना असल्याचे सांगून शकिब म्हणाला की, ज्या वेस्ट इंडीजने जगातील प्रत्येक क्रिकेटपटूला प्रेरणा दिली, त्यांना मदतीची गरज असताना आमच्यापैकी कोणीही मागे राहणार नाही. किंबहुना आमच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वोत्तम घटना असल्याचीच माझी भावना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)