मतदानावर बहिष्कार टाकलेल्या देऊळगाव रसाळमध्ये 71 टक्‍के मतदान

बारामती- कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके बसत असल्याने बारामती तालुक्‍यातील देऊळगाव रसाळ या गावाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा ठराव देखील ग्रामसभेत केला होता. ग्रामस्थांच्या साक्षीने हा ठराव करण्यात आला होता बारामती तालुक्‍यातील देऊळगाव रसाळ या गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. त्याची चर्चा सर्वत्र होती. त्यानंतर गाव पातळीवर राजकीय घडामोडी घडल्या काही गाव पुढाऱ्यांनी गावात मतदान झाले पाहिजे, असे म्हणणे मांडत गावकऱ्यांना समजावले त्यानंतर आज (मंगळवारी) देऊळगाव रसाळ या गावात 71 टक्‍के मतदानाची नोंद झाली .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.