मक्‍यावर अळी रोगाचा प्रादुर्भाव

चिंबळी- यावर्षी सगळीकडे कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळाची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे ज्वारीच्या कडब्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने बाजारभाव ही वाढत असल्याने जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी चिंबळी परिसरात शेतकरी वर्गानी मका पिकाची टोकण पद्धतीने लागवड करण्यात आली असून गेल्या 15 दिवसांपासून कडक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने व इंद्रायणी नदीचे पाणी दूषित असल्याने या परिसरातील शेतकरी वर्गाने विहिरीच्या पाण्यावर मका पीक जगवले मात्र, उन्हाचे चटके व अधुन मधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने मका पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गानी औषध फवारणी करून पिकाची चांगल्या प्रकारे निगा राखण्याचे काम हाती घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.